उपरिचर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

उपरिचर हा कुरुवंशीय राजा होता. कुरुवंशातील सुधन्वन् राजाच्या वंशशाखेतील कृतयज्ञ राजाचा हा पुत्र होता. याचे मूळ नाव वसु होते, परंतु इंद्राने भेट दिलेल्या दिव्य विमानातून हा भ्रमण करू लागल्याने यास उपरिचर या उपाधीने ओळखले जाऊ लागले. इंद्राच्या निर्देशावरून याने यादवांकडून चेदी देश जिंकून घेतला. याला गिरिका नावाची एक पत्नी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →