इस्लाम

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

इस्लाम हा एक आदम प्रथम पुरूषआहे असे मानणारा धर्म असून अल्लाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. हा धर्म प्रथम पुरुष आदमपासूनच अस्तित्वसात आला. त्याचे अंतिम संदेश आणणारे दुत हजरत मुहम्मद पैगंबर सलअम यांनी इ.स. ६१० मध्ये अरब़च्या मक्का या पवित्र शहरात लोकांना एका इश्र्वराबद्दल अहवान केले. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हणले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस (२०२० साली) साधारपणे १९० कोटी (२४.४ टक्के) आहे. लोकसंख्येनुसार ख्रिश्चन धर्मांनंतर इस्लाम हा जगातील दुसरा सर्वांत मोठा धर्म समुदाय आहे. यातील २० कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे.

प्रेषित मुहम्मद (त्यांच्यावर शांती असो) अंतिम प्रेषित असुन त्यांना पवित्र कुरआन हा अल्लाहचा (सृष्टिकर्त्याचा) संदेश मिळाला आहे.

त्यांच्या नंतर दिव्य कुरआन समस्त मानवांसाठी सदाचार करून मुक्ती प्राप्तिचा एकमेव मार्ग आहे. इस्लाम एकमेव असा धर्म आहे जो देवाच्या एकमेवतेला मानतो आणि आणि मानवजातीला ऐक्य शिकवतो. त्याच वेळी इतर दृष्टिकोनातून सहिष्णू आहे, याचे चांगले उदाहरण म्हणजे आदरणीय प्रेषित मुहम्मद सलअम आणि त्यांचे सहकारी यांच्या शांततेत व सहिष्णू जीवन चरित्र आहे. खरे तर, तो अल्लाहने प्रथम मानव आणि इस्लामचे पहिले प्रेषित आदम यांच्यापासून अंतिम प्रेषित मुहम्मद सलअम यांच्यापर्यंत पाठविला, तो ईश्वराच्या एकमेवतेचा संदेश आणि सर्व वंशांच्या बंधुत्वाचा मूळ संदेश आहे. इस्लाम अल्लाच्या एकमेवतेच्या आणि सर्व मानवजातीच्या बंधुत्वाच्या या शिकवणीची देखभाल करतो. मुसलमान त्यांच्या धर्माला इस्लाम म्हणतात. (अरबी शब्द इस्लामचा अर्थ अल्लाच्या अधीन राहून शांती मिळवणे होय.) मुसलमान हा शब्द इस्लामच्या नावावरून बनलेले एक विशेषण आहे आणि ज्याचा अर्थ इस्लाम धर्म पाळणारा माणूस. अल्लाहच्या आदेशांसमोर पूर्ण शरणागती म्हणजे इस्लाम . अल्लाहचे एकत्व, सर्व प्रेषितांचे प्रेषित्व (कुरआन अल्लाहची वाणी आहे, फरिश्ते जिब्रील यांनी ते अल्लाहकडून प्रेषित मुहम्मद सलअम यांच्या पर्यंत पोहोचविले,या तत्वाशी इमान राखणे ) आणि मरणोत्तर जीवन (मेल्यानंतर कायामातनंतर पुन्हा जिवंत केले जाणार आणि केल्या सावरल्याचा जाब अल्लाहला द्यावा लागणार,इमाने इतबारे सत्कर्म केले तर जन्नत मिळेल नाही तर जहन्नुम मध्ये नेहमी जळावे लागेल, या तत्वाशी इमान राखणे ) या तीन तत्वांशी इमान राखनारी व्यक्ती मुस्लिम (आज्ञाधारक ) असते .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →