इल्से कोहलर-रोलेफसन ही एक जर्मन शास्त्रज्ञ आहे जी पशुपालन, पारंपरिक पशुऔषधी आणि उंटांवरील प्रेमासाठी ओळखली जाते. राजस्थानातील रायका समुदायाचे जीवन उंटांवर अवलंबून असून, मुळात उंटांचे जीवन धोक्यात आले होते. यासाठी तिने रायका (उर्फ रबारी) लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या कामासाठी २०१७ मध्ये तिला भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार आणि २०१८ मध्ये जर्मन संघराज्य सरकारच्या फेडरल क्रॉस ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इल्से कोहलर-रोलेफसन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.