उंट (लॅटिन: camelus) हा कॅमेलस वंशातील एक समखुरी प्राणि-गणातल्या टायलोपोडा उपगणातील एक प्राणी आहे. त्याच्या पाठीवर "मदार" म्हणून ओळखले जाणारे विशिष्ट चरबीचे साठे असतात. उंट फार पूर्वीपासून पाळले जातात आणि पशुधन म्हणून ते अन्न (दूध आणि मांस) तसेच कापड देखील प्रदान करतात. उंट हे काम करणारे प्राणी आहेत जे विशेषतः त्यांच्या वाळवंटातील निवासस्थानासाठी अनुकूल आहेत. हे प्राणी प्रवासी आणि मालवाहू वाहतुकीसाठी एक महत्त्वाचे साधन आहे.
उंटाच्या तीन जिवंत प्रजाती आहेत. जगातील उंटांच्या एकूण लोकसंख्येपैकी एक-कुबड ड्रोमेडरी किंवा अरबी उंटांची संख्या ९४% आहे आणि दोन-कुबड असलेला बॅक्ट्रियन उंटांची संख्या ६% आहे. तर जंगली बॅक्ट्रियन उंट ही एक वेगळी प्रजाती आहे, जी आता गंभीरपणे धोक्यात आहे.
उंट हा शब्द अनौपचारिक रीतीने व्यापक अर्थानेही वापरला जातो, जेथे कॅमेलिड कुटुंबातील सर्व सात प्रजातींचा समावेश करण्यासाठी अधिक योग्य शब्द "कॅमेलिड" आहे. यामध्ये खरे उंट (वरील तीन प्रजाती) आणि पुढील "न्यू वर्ल्ड" जातीच्या उंटांचा समावेश होतो: लामा, अल्पाका, गुआनाको, आणि विकुना, जे लॅमिनी या स्वतंत्र जमातीशी संबंधित आहेत. या पैकी लामा अल्पाका, ग्वुनाको, विकुना या दक्षिण अमेरिका खंडात आढळणाऱ्या उप प्रजाती आहेत. उत्तर अमेरिकेत इओसीन काळात उंटांचा उगम झाला होता. पॅराकेमेलस हे आधुनिक उंटांचे पूर्वज बेरिंग लँड ब्रिज ओलांडून आशियामध्ये सुमारे ६ दशलक्ष वर्षांपूर्वी मायोसीनच्या उत्तरार्धात स्थलांतरित झाले होते.
उंट साधारणपणे चाळीस ते पन्नास वर्षे जगतो. पूर्ण वाढ झालेल्या ऊंटाची उंची साधारणपणे वाशींडांना धरून सात फूटांपेक्षा जास्त असते. उंटाचा वेगाने धावण्याचा वेग पासष्ट कि.मी. प्रति तास असतो. तर लांबवर पल्ला गाठण्याचा वेग चाळीस कि.मी. प्रति तास असतो.
उंट
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!