इरावती कर्वे ( डिसेंबर १५, १९०५,म्यानमार - मृत्यु:ऑगस्ट ११, १९७०) या मराठी लेखिका होत.मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते.नातेसंबंधांबद्दल योगदान दिले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इरावती कर्वे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.