इराण–इराक युद्ध इ.स. १९८० ते १९८८ दरम्यान पश्चिम आशियातील इराण व इराक देशांदरम्यान लढले गेले. आठ वर्षे चाललेले हे युद्ध २०व्या शतकामधील दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात रक्तरंजित युद्ध मानले जाते.
ह्या युद्धापूर्वी अनेक वर्षे इराण व इराकदरम्यान सीमातंटा सुरू होता. १९७९ सालच्या इराणी क्रांतीनंतर इराकचा राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन ह्याला इराकमधील बहुसंख्य शिया जनता बंडखोरी करेल ही धास्ती वाटू लागली. २२ सप्टेंबर १९८० रोजी कोणत्याही पूर्वसूचनेविना इराकने इराणवर हवाई हल्ला केला. सुरुवातीस पीछेहाट झाल्यानंतर इराणने नेटाने लढा दिला व जून १९८२ मध्ये इराणने गमावलेला सर्व भूभाग परत मिळवला. त्यानंतरची ६ वर्षे युद्धात इराणचा वरचष्मा होता. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने वारंवार युद्धबंदीचे आवाहन केल्यानंतर अखेरीस २० ऑगस्ट १९८८ रोजी लढाई थांबली.
ह्या युद्धामध्ये दोन्ही देशांचे अतोनात नुकसान व जिवितहानी झाली परंतु सीमास्थिती बदलली नाही.
इराण–इराक युद्ध
थोडक्यात पण महत्त्वाचे.