जेम्स बाँड हा नायक असलेल्या बाँड्स कथा लिहिणारे इयान फ्लेमिंग यांचा जन्म १९०८मध्ये झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इटॉन इथे झाले. सॅॅंडहर्स्ट इथे काही काळ घालवल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. परराष्ट्र कार्यालयात नोकरी न मिळू शकल्याने, १९३१मध्ये ते रुचर्स न्यूझ एजन्सी मध्ये रुजू झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, त्यांनी नौदल गुप्तहेर विभाग संचालकांचा पीए म्हणून काम केले. तेथे त्यांचा हुद्दा लेफ्टनंटवरून कमांडरपर्यंत वाढला. त्यांच्या युद्धकाळातील अनुभवांतून त्यांना गुप्त कारवायांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
युद्धानंतर फ्लेमिंग हे केम्स्ली न्यूझ पेपर्समध्ये परराष्ट्र लेखन व्यवस्थापक झाले. त्यांनी जमैकामध्ये आपले 'गोल्डनएज' नावाचे घर बांधले. याच घरात १९५३मध्ये, वयाच्या ४२ व्या वर्षी इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बाँड कादंब्यऱ्यांपैकी पहिली, 'कॅसिनो रोयाल' लिहिली. इयान फ्लेमिंग यांचं १९६४ मध्ये निधन झाले; पण तत्पूर्वी त्यांच्या १४ बाँड कादंबऱ्यांच्या ४ कोटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या, आणि अशा प्रकारे जेम्स बाँड हे पात्र जागतिक स्तरावर प्रस्थापित झाले.
इयान फ्लेमिंग
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.