डॉ. नो

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

डॉ. नो

डॉ. नो हा इ.स. १९६२ साली प्रदर्शित झालेला पहिला बॉन्डपट होता जो टेरेन्स यंग यांनी दिग्दर्शित केलाले ब्रिटिश चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये जेम्स बॉन्डची भूमिका शॉन कॉनरी ह्याने केली होती. हा जेम्स बाँड मालिकेतील पहिला चित्रपट आहे आणि त्यात कॉनरी काल्पनिक एम.आय.६ एजंटची भूमिका साकारत आहेत. उर्सुला अँड्रेस, जोसेफ वाईजमन आणि जॅक लॉर्ड यांच्या सह-अभिनयात हा इयान फ्लेमिंग यांच्या १९५८ च्या कादंबरीवरून रूपांतरीत केले होते. हा चित्रपट इऑन प्रॉडक्शनच्या हॅरी साल्ट्झमन आणि अल्बर्ट आर. ब्रोकोली यांनी तयार केला होता.

चित्रपटात, जेम्स बाँडला एका सहकारी ब्रिटिश एजंटच्या बेपत्ता होण्याच्या चौकशीसाठी जमैकाला पाठवले जाते. हा मार्ग त्याला डॉ. ज्युलियस नोच्या भूमिगत तळावर घेऊन जातो, जो रेडिओ बीम शस्त्राने केप कॅनावेरल येथून सुरुवातीच्या अमेरिकन अंतराळ प्रक्षेपणात व्यत्यय आणण्याचा कट रचत आहे.



जरी बॉन्डवरील हा पहिला चित्रपट असला तरी फ्लेमिंगच्या पुस्तकांच्या मालिकेत हा सहावा आहे. ह्या पुस्तकांची मालिका कॅसिनो रॉयल पासून सुरू झाली. म्हणून या चित्रपटात आधीच्या पुस्तकांमधील काही धाग्यांचे संदर्भ आहेत. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या डॉ. नो चित्रपटाला आर्थिक यश मिळाले. चित्रपट ५ ऑक्टोबर १९६२ला प्रकाशित झाल्यावर संमिश्र टीकात्मक प्रतिक्रिया मिळाल्या तरी, कालांतराने तो मालिकेतील सर्वोत्तम भागांपैकी एक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. डॉ. नो चित्रपटाने १९६० च्या दशकात भरभराटीला आलेल्या गुप्तहेर चित्रपटांची सुरुवात केली. या चित्रपटाने त्याच्या प्रमोशन आणि मार्केटिंगचा भाग म्हणून कॉमिक बुक रूपांतर आणि साउंडट्रॅक अल्बम तयार केला.

डॉ. नो मध्ये एका सामान्य जेम्स बाँड चित्रपटाचे अनेक पैलू स्थापित झाले. चित्रपटाची सुरुवात बंदुकीच्या नळीच्या दृश्याद्वारे आणि अत्यंत शैलीबद्ध मुख्य शीर्षक अनुक्रमातून पात्राची ओळख करून देऊन होते, जे दोन्ही घटक मॉरिस बाइंडर यांनी तयार केले होते. यामध्ये चित्रपटाचे संगीतकार मोंटी नॉर्मन यांनी बनवलेले प्रसिद्ध थीम संगीत देखील सादर केले आहे. प्रोडक्शन डिझायनर केन ॲडम यांनी एक विस्तृत दृश्य शैली स्थापित केली जी चित्रपट मालिकेच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे. डॉ. नो नंतर १९६३ मध्ये फ्रॉम रशिया विथ लव्ह हा चित्रपट आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →