इयान नेपोम्नियाच्ची

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

इयान नेपोम्नियाच्ची

इयान अलेक्झांड्रोविच नेपोम्नियाच्ची (जन्म: १४ जुलै १९९०) हा एक रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. नेपोम्नियाच्ची हा मॅग्नस कार्लसनसोबत तत्कालीन ब्लिट्झ बुद्धिबळ विश्वविजेता आहे. तो सलग दोन वेळा कॅंडिडेट्स स्पर्धा जिंकणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. तो सध्या रशियाचा सर्वोच्च क्रमांकाचा सक्रिय बुद्धिबळपटू आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये, तो फिडे ग्रँड प्रिक्स मध्ये दुसरे स्थान मिळवून २०२० च्या कॅंडिडेटस् स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्याने २०२० च्या फिडे कॅंडिडेटस् स्पर्धेत एक फेरी शिल्लक असतानाच विजय मिळवला, ज्यामुळे तो जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०२१ मध्ये विश्वविजेतेपदासाठी आव्हान देईला पात्र ठरला, परंतु गतविजेता मॅग्नस कार्लसनकडून त्याचे आव्हान हरला. जुलै २०२२ मध्ये, त्याने २०२२ च्या फिडे कॅंडिडेटस् स्पर्धेत पुन्हा एक फेरी शिल्लक असताना विजय मिळवला, ज्यामुळे त्याने सलग दोन कॅंडिडेटस् स्पर्धा जिंकल्या आणि पुन्हा एकदा त्याला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०२३ मध्ये खेळण्यासाठी पात्रता मिळाली. याव्यतिरिक्त, २०१३ मध्ये आधुनिक स्वरूप सुरू झाल्यापासून त्याने कोणत्याही कॅंडिडेटस् स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवल्या. तथापि, २०२३ मध्ये टायब्रेकच्या चौथ्या खेळामध्ये डिंग लिरेनकडून पराभूत झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद विजेतेपदासाठीचे आव्हान गमावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →