२०२१ ची जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन आणि आव्हान देणारा इयान नेपोम्नियाच्ची यांच्यातील सामना होता, ज्यामुळे बुद्धिबळ विश्विविजेता निश्चित झाला. हे सामने दुबई शहरात फिडे (जागतिक बुद्धिबळ महासंघा)च्या नियंत्रणाखाली दिनांक २४ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर, इ.स. २०२१ या कालावधीत खेळवले गेले.
चौदा नियोजित सामन्यांपैकी अकरा सामन्यांनंतर सामन्याचा निर्णय घेण्यात आला. १० डिसेंबर २०२१ रोजी कार्लसनने आपले जेतेपद कायम ठेवले आणि पाचव्यांदा जागतिक अजिंक्यपद जिंकून त्यानी विश्वनाथन आनंदशी बरोबरी केली.
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०२१
थोडक्यात पण महत्त्वाचे.