इतिकाफ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इतिकाफ

इतिकाफ (Iʿtikāf (Arabic: اعتكاف) ही इस्लामची एक परंपरा आहे . रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत मुस्लिम लोकं काही दिवसांकरिता इबादत करण्यासाठी घर सोडून मस्जिदीत एकांतवासात जातात, त्यालाच एतेकाफ किंवा इतिकाफ असे म्हणतात. नेहमीच्या दैनंदिनीतुन काही दिवस काढून एकांतात चिंतन मनन करणे आवश्यक आहे. थोडे एकांतात थांबुन स्वतःचा, स्वतःच्या भोवतालच्या जगाविषयी आत्मचिंतनदेखील करणे आवश्यक आहे. आपलं लक्ष्य काय आणि त्यासाठी आपण आतापर्यंत केलेले प्रयत्न किती? कशासाठी करायचे वगैरे या सर्व गोष्टींकडे माणसाचं कधी कधी दुर्लक्ष होते. सर्वात महत्वाचं म्हणजे आपला निर्मिक कोण? त्याला आपल्या कर्माचा जाब द्यावा लागणार आहे कि नाही? त्याने आपल्यासाठी ग्रंथरूपी जे मार्गदर्शन प्रेषितामार्फत दिले आहे, त्यात एक माणूस म्हणून माझे काय कर्तव्य आहे? या सर्वांसाठी त्या ग्रंथाचे वाचन, पठन, चिंतन मनन, अल्लाहचे नामःस्मरण करण्याकरिता रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात मशिदीत एका कोपऱ्यात काही लोकं एकांतवासात जातात, त्याला एतेकाफ किंवा इतिकाफ किंवा बोली भाषेत 'एतेकाफ' देखील म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →