२२१०५ डाऊन व २२१०६ अप क्रमांकाची इंद्रायणी एक्सप्रेस ही भारतीय मध्य रेल्वेची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पुणे दरम्यान धावणारी एक वेगवान आगगाडी आहे.
दररोज धावणाऱ्या या गाडीला पुण्याजवळून वाहणाऱ्या ‘इंद्रायणी’ नदीचे नाव दिले आहे.
सुरुवातीस हीच गाडी मुंबई - पुणे दरम्यान १०२१ क्रमांकाची गाडी व पुणे - मुंबई दरम्यान १०२२ क्रमांकाची गाडी म्हणून धावत असे. तीच गाडी आता नव्या क्रमांकाने धावते.
इंद्रायणी एक्सप्रेस
या विषयावर तज्ञ बना.