अहोम सैन्यात घोडदळ, पायदळ तसेच नौदलचा समावेश होता. अहोम राज्याचे सैन्य पाईक पद्धत मिलिशियावर (सैन्यात नसलेल्या परंतु लष्करी शिक्षण घेतलेल्या नागरिकांची सेना) आधारीत होती. अहोम साम्राज्य स.न. १२२२ ते १८२४ पर्यंत अस्तित्वात होते. १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अहोम साम्राज्याकडे पुर्णवेळ सैनिकांची तुकडी नव्हती. पूर्णानंदन बुरहागोहाईन यांनी मोमोरिया बंडखोरीला काबूत ठेवण्याच्या बाबतीत कॅप्टन थॉमस वेल्शच्या शिपायांची प्रभाव लक्षात घेउन पुर्णवेळ सैनिकांची तुकडी तयार केली.
अहोम सैन्य बंगालचा सुलतान आणि मुघल साम्राज्य यांच्याशी लढत होते. तसेच दक्षिणेकडील कोनबंग (बर्मा) घराण्याशीसुद्धा संघर्ष होता. या सैन्याने तुर्बकच्या (१५३२) सैन्याचा निर्णायक पराभव केला होता. मुघल साम्राज्याच्या विरोधात सराईघाटची लढाई (इ.स. १६७१), आणि इटाखुलीची लढाई (१६८२) देखील अहोम सैन्याने जिंकली होती यामुळे आसाममधून मुघल सैन्याची हकालपट्टी झाली होती. या सैन्याचे मोठे अपयश म्हणजे चिलराईची (१६५३) लढाई होती. ही लढाई मीर जुमला द्वितीय (१६६२)च्या सैन्याच्या विरोधात होती तसेच आसामवर (१८१७, १८१९, १८२१) बर्मी आक्रमण झाले . अहोम राज्य पश्चिमेकडील सर्व आक्रमणांना रोखू शकला असला तरी, हे दक्षिणेकडील एकमेव महत्त्वपूर्ण आव्हानाला भिडले आणि ते नष्ट झाले.
आहोम सैन्य
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!