आसिफ अली झरदारी (उर्दू: آصف علی زرداری; सिंधी: آصف علي زرداري; २६ जुलै १९५५) हा एक पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तानचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००८ ते २०१३ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला झरदारी हा लोकशाही मार्गाने निवडुन आलेला व ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा पाकिस्तानचा पहिलाच राष्ट्राध्यक्ष आहे.
पाकिस्तानची दिवंगत पंतप्रधान व लोकप्रिय पुढारी बेनझीर भुट्टोचा पती असलेला झरदारी भुट्टोच्या मंत्रीमंडळामध्ये अनेक खात्यांवर होता. १९९६ साली झरदारीला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिक्षा झाली. २००४ साली तुरूंगातून सुटल्यानंतर झरदारीने पुढील अनेक वर्षे दुबईमध्ये व्यतीत केली. डिसेंबर २००७ मधील बेनझीर भुट्टोच्या हत्येनंतर झरदारी पकिस्तानात परतला व त्याने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेतृत्व हाती घेतले. सप्टेंबर २००८ मध्ये तो निवडणुकीमध्ये विजय मिळवून पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष झाला. आपल्या कार्यकाळादरम्यान झरदारीने अफगाणिस्तानात चालू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेसोबत सहकार्य केले तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानसाठी कोट्यावधी डॉलर्सचे कर्ज मिळवले.
आसिफ अली झरदारी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.