परवेझ मुशर्रफ (उर्दू: پرویز مشرف; ११ ऑगस्ट १९४३ - ०५ फेब्रुवारी २०२३) हे एक निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी (जनरल), पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख व माजी राष्ट्राध्यक्ष होते.
१९९९ साली पाकिस्तानचा लष्करप्रमुख असताना मुशर्रफच्या सैन्याला कारगील युद्धामध्ये भारताकडून पराभूत व्हावे लागले. ह्यावरून मुशर्रफ व तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ ह्यांच्या दरम्यान पराकोटीचे मतभेद निर्माण झाले होते. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी नवाझ शरीफने मुशर्रफला लष्करप्रमुख पदावरून काढल्याचे वृत्त कळताच मुशर्रफने नवाझ शरीफ विरुद्ध लष्करी बंड पुकारले व देशाची सत्ता हातात घेतली. १५ ऑक्टोबर १९९९ रोजी मुशर्रफने पाकिस्तानचे संविधान निलंबित केले, देशामध्ये आणीबाणी जाहीर केली व स्वतःला पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखपदावर नियुक्त केले. त्याने नवाझ शरीफला अटकेत टाकून नंतर देश सोडण्यास भाग पाडले.
२००१ साली घेण्यात आलेल्या एका बनावटी जनमतामध्ये विजय मिळवून मुशर्रफ अधिकृतपणे पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष झाले. २००७ सालापर्यंत पाकिस्तानमधील जनतेचे मत त्याच्याबद्दल प्रतिकूल झाले होते. डिसेंबर २००७ मध्ये बेनझीर भुट्टोची हत्या झाल्यानंतर अखेर १८ ऑगस्ट २००८ रोजी मुशर्रफने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला व लंडनकडे पळ काढला. पुढील ४ वर्षे लंडनमध्ये राहिल्यानंतर २४ मार्च २०१३ रोजी तो पाकिस्तानात परतला. तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने मुशर्रला ठार मारण्याची धमकी दिली होती. पाकिस्तानात परतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला अटक करून त्याच्यावर देशद्रोह, खून इत्यादी आरोपांवरून खटला भरला.
परवेझ मुशर्रफ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?