आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे. भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले आहे.
हया उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोविएत संघराज्यातील व आतच्या रशिया मधिल कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरून १९ एप्रिल १९७५ साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले.
सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इस्रो ) विकसीत केला होता. सुमारे पाच दिवस पृथ्वी भवती प्रदक्षीणा घातल्या नंतर उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला. ह्या उपग्रहाने ११ फेब्रुवारी १९९२ साली पृथ्वीच्या वातावरणात पुनःप्रवेश केला होता.
आर्यभट्ट उपग्रह
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.