सतीश धवन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सतीश धवन

सतीश धवन (२५ सप्टेंबर, १९२० – ३ जानेवारी, २००२) हे एक भारतीय गणितज्ञ आणि अवकाश अभियंता होते. त्यांनी १९७२ ते १९८४ पर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि त्यांना भारतातील प्रायोगिक द्रव गतिमान संशोधनाचे जनक मानले जाते. यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले.

त्यांनी ग्रामीण शिक्षण, रिमोट सेन्सिंग तसेच उपग्रह संप्रेषणच्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारतीय राष्ट्रीय उपग्रह - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि पी.एस.एल.व्ही. - ध्रुवीय उपग्रह लँच वाहन यासारखे प्रकल्प भारत यशस्वी करू शकला.

त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →