आरमोरी विधानसभा मतदारसंघ - ६७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार आरमोरी मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील १. देसाईगंज (वडसा), २. आरमोरी, ३. कुरखेडा, ४. कोर्ची ही तालुके आणि ५. धानोरा तालुक्यातील मुरुमगांव हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. आरमोरी हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.
भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दामाजी गजबे हे आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
आरमोरी विधानसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?