ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ - ७३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार ब्रम्हपुरी मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील
सावली व
सिंदेवाही (ही दोन्ही संपूर्ण तालुके) आणि
ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रह्मपुरी ही महसूल मंडळे आणि (ब्रह्मपुरी नगरपालिका) क्षेत्राचा समावेश होतो.
ब्रम्हपुरी हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजय नामदेवराव वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.