आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद ही एक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा आहे. इंटरनॅशनल शूटींग स्पोर्ट फेडरेशन (International Shooting Sport Federation) ही संस्था ही स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजीत करते. पहिली नेमबाजी स्पर्धा इ.स. १८९७ साली खेळवली गेली. १९३१ सालापर्यंत ही स्पर्धा पहिल्या महायुद्धाचा काळ वगळता दरवर्षी खेळवली जात होती. त्यानंतर १९५४ पर्यंत दुसऱ्या महायुद्धाचा काळ वगळता दर दोन वर्षांनी व तेव्हापासून दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
भारतीय नेमबाजांनी आजवरच्या स्पर्धांमध्ये ६ सुवर्ण, २ रौप्य तर ८ कांस्य पदके मिळवली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये अभिनव बिंद्रा, मानवजीत सिंग संधू, तेजस्विनी सावंत, एशर नोरीया ह्या नेमबाजांचा समावेश आहे. गगन नारंगने २०१० स्पर्धेमध्ये एक कांस्यपदक जिंकले होते.
आय.एस.एस.एफ. विश्व नेमबाजी अजिंक्यपद
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.