आय.एस. जोहर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

इंद्रजित सिंग जोहर तथा आय.एस. जोहर (१६ फेब्रुवारी, १९२०:तलगंग, पश्चिम पंजाब, पाकिस्तान - १० मार्च, १९८४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) एक भारतीय अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होते. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये मुख्यत्वे विनोदी भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांमध्ये लॉरेन्स ऑफ अरेबिया चित्रपटाती मधील गासिमच्या भूमिकेबद्दल प्रसिद्ध आहेत.

जोहर यांनी आताच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या लाहोर मध्ये अर्थशास्त्र आणि राजकारणात एमए पदवी घेतली व नंतर एलएलबीचे शिक्षण घेतले. ऑगस्ट १९४७मध्ये, भारताच्या फाळणीच्या वेळी, जोहर आपल्या कुटुंबासह पटियाला येथे लग्नासाठी जात असताना लाहोरमध्ये मोठी दंगल उसळली त्यात शाह आलमी बाजार हा एकेकाळचा हिंदू भाग जोहर यांच्या घरासह पूर्णपणे जळून खाक झाला.

जोहर पुन्हा कधी लाहोरला परतले नाहीत. काही काळ त्यांनी जालंधरमध्ये काम केले. त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले., १९४९ मध्ये त्यांनी मुंबईला जाउन हिंदी विनोदी थरारपट चित्रपट 'एक थी लडकी'मधून अभिनय पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →