"आयुषः सम्बन्धी वेदः आयुर्वेदः" अशी आयुर्वेदाची व्याख्या आचार्य वाग्भट यांनी आपल्या अष्टांगहृदय य ग्रन्थत केली आहे.
आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे, जो स्वस्थ असेल त्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोग्याची रोगापासून मुक्तता करणे. यात मुख्य प्रश्न असा कि जो स्वस्थ आहे, त्याला हे रोग येतात कुठून? जर कारणच नाहीसं झालं तर रोग होणारच नाहीत. य सर्व रोगांचे मूळ कारण म्हणजे वात, पित्त आणि कफ या तिघांचा असमतोल. म्हणून यांना त्रिदोष असेही म्हणतात. ‘दूषयन्तीति दोषाः।’ शरीरात वात, कफ व पित्त या तिन्हीत असंतुलन निर्माण झाल्यास हे शरीरास दूषित करतात, म्हणून यांना दोष म्हणतात. हे तीन दोष समस्त शरीरात व्याप्त असतात तरीसुद्धा नाभि आणि हदयाच्या मध्ये पित्त आणि हदयाच्या वरती कफाचे स्थान आहे. म्हातारपणी वायु प्रकोप अधिक असतो. युवावस्था मध्ये पित्तचा प्रकोप अधिक असतो. तर बालपणी कफाचा प्रकोप अधिक असतो .
आयुर्वेदातील त्रिदोष
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.