आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस

यामागील विज्ञान आणि इतिहास.

आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस

आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस (इंग्लिश: African National Congress, आफ्रिकन नॅशनल काँग्रेस) हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताकातील समाजवादी गणतांत्रिक विचारसरणीचा पक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या या पक्षाची सत्ता असून पक्षाध्यक्ष जेकब झुमा हे प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.

दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाचा कालखंड संपल्यानंतर इ.स. १९९४ साली नेल्सन मंडेला देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले. तेव्हापासून आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर सत्ता राखून आहे. इ.स. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेसने ६९.७% मते मिळवली, इ.स. २००९ च्या निवडणुकांत तिने ६५.९% मते कमावली, तर इ.स. २०१४ सालच्या निवडणुकांत तिने ६२.१५% मिळवली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →