चंद्रपूर येथील आदिवासी साहित्य जागर आणि जतन संसद याद्वारे १ले आदिवासी उलगुलानवेध साहित्यसंमेलन, चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात ११ जुलै, इ.स. २०११ला झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका प्रा. कुमुद पावडे होत्या.
आदिवासी साहित्य जागर आणि जतन अकादमी यांच्या वतीने २रे आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन, चंद्रपूरला १७ नोव्हेंबर, इ.स. २०१२ला झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे होते.
तिसरे उलगुलानवेध साहित्य संमेलन १९ जानेवारी २०१४ रोजी गडचिरोलीतील पटेल मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गंगाधर पानतावणे होते.
हे उलगुलानवेध साहित्य संमेलन आणि आदिवासी साहित्य संमेलन ही वेगळी आहेत.
आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.