आत्माराम नाटेकर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

आत्माराम विठ्ठल नाटेकर (जन्म : ७ ऑगस्ट १९६४) हे एक मराठी पत्रकार आहेत.

१५ एप्रिल १९८९पासून ते दैनिक लोकसत्ता या वर्तमानपत्रात काम करीत आहेत.

त्यांनी यापूर्वी दैनिक शिवनेरी आणि दैनिक सामना या वृत्तपत्रांतही नोकरी केली होती. त्यांचे दैनिक लोकसत्तातील चतुरंग, लोकरंग, ठाणे वृत्तान्त, रविवार वृत्तान्त या पुरवण्यांमध्ये विविध विषयांवर लेख प्रसिद्ध झाले आहेत.

डोंबिवली लोकसेवा समिती सामाजिक संस्थेचे ते ११ वर्षे अध्यक्ष होते. मुंबई मराठी पत्रकार संघाचे आजीव सदस्य असून सन १९९३ ते १९९७ या काळात संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →