आण्विक बळ सूक्ष्मदर्शक यंत्र (इंग्लिश: Atomic force microscope, अटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप ; इंग्लिश लघुरूप: AFM, एएफएम), अर्थात क्रमवीक्षण बळ सूक्ष्मदर्शक यंत्र (इंग्लिश: Scanning force microscope, स्कॅनिंग फोर्स मायक्रोस्कोप ; इंग्लिश लघुरूप: SFM, एसएफएम), हे नॅनोमीटरपेक्षाही सूक्ष्म स्तर दाखवू शकणारे एक अति-विभेदनशील सूक्ष्मदर्शक आहे. प्रकाशिक सूक्ष्मदर्शकांच्या तुलनेने याची क्षमता १००० पट अधिक आहे. गेर्ड बिनिश आणि हाइनरिख रोहरर यांनी बनवलेल्या अवलोकन टनेलिंग सूक्ष्मदर्शी यंत्रापासून आण्विक बळ सूक्ष्मदर्शक बनवला. त्यासाठी त्यांना इ.स. १९८६ साली नोबेल पुरस्कार मिळाला. बिनिश, कॅल्विन केट व क्रिस्तोफ गेर्बर यांनी इ.स. १९८६ साली पहिल्यांदा आण्विक बल सूक्ष्मदर्शक बनवले. आज नॅनोस्तरावर प्रतिबिंबन, मापन व दक्षप्रयोग यांत हे यंत्र महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. खरे पाहता या यंत्राला सूक्ष्मदर्शक म्हणणे चपखल ठरत नाही, कारण हे यंत्र एका यांत्रिक अन्वेषिकेद्वारे प्रतिबिंब बनवते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आण्विक बल सूक्ष्मदर्शक यंत्र
थोडक्यात पण महत्त्वाचे.