आगरी साहित्य विकास महामंडळ दर वर्षी आगरी साहित्य संमेलन आयोजित करते.
१३ वे आगरी साहित्य राज्यस्तरीय संमेलन नवीन पनवेल वसाहतीमध्ये १० व ११ जानेवारी २०१५ या कालावधीत होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष कादंबरीकार चंद्रकांत मढवी हे आहेत.
१२ वे आगरी साहित्य संमेलन अलीबागजवळील चेंढरे या गावी २ व ३ मार्च २०१४ या कालावधीत झाले. अध्यक्षस्थानी कैलास पिंगळे होते.
११ वे राज्यस्तरीय आगरी साहित्य संमेलन भांडुप (मुंबई) येथे झाले होते.
राज्यस्तरीय दहावे आगरी साहित्य संमेलन १७ आणि १८ डिसेंबर २०११ या कालावधीत पनवेलच्या उलवा नोडमधील वहाळ या गावात झाले.
९ वे येथील दिवंगत कवी परेन शिवराम जांभळे साहित्यनगरीत आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने ११ व १२ डिसेंबर २०१० या कालावधीत वाशीगाव येथे झाले. संमेलनाध्यपदी साहित्यिक अविनाश पाटील होते.
भिवंडीत फेब्रुवारी २००५ मध्ये ४ थे अखिल महाराष्ट्र आगरी साहित्य संमेलन भरविण्यात आले होते.
पहा :- साहित्य संमेलने
आगरी साहित्य संमेलन
या विषयातील रहस्ये उलगडा.