आकाशकंदील हा दिवाळी सणाचा विशेष मानला जातो. या सणाला स्वतःच्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लोकांना दिसेल अशा उंच जागी व शक्यतोवर पूर्व दिशेस हा आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. हा आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो. अलीकडील काळात आकर्षक प्लास्टिकचे वा कागदापासून बनवलेले आकाशकंदील विकत मिळतात. दिवाळी सणानिमित्त विविध रंगाचे, प्रकारचे आकाशकंदील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असतात तसेच भारतात तयार होत असलेल्या
कंदिलांना परदेशात मागणी असते. भारतातील दीपावलीप्रमाणेच चीन व जपानमध्येही वेगवेगळ्या प्रसंगांनुसार आकाशदिव्यांच्या वापराची प्रथा आहे.
आकाशकंदील
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.