डाॅ. अनंत पांडुरंग देशपांडे हे मराठीत प्रामुख्याने विज्ञानविषयक पुस्तके व लेख लिहिणारे लेखक आहेत. २०१८मध्ये ते मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह झाले.
अ.पां. देशपांडे हे मुळात इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर. त्यांनी पुणे आणि मुंबई येथे चार कारखान्यांत मिळून ३५ वर्षे नोकरी केली. देशपांडे हे इ.स. १९७४पासून 'मराठी विज्ञान परिषदे'च्या मध्यवर्ती संस्थेचे कार्यवाह आहेत. परिषदेच्या सर्व प्रकारच्या वाढीत त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी 'नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स' ही संस्था १९९७ साली स्थापन केली. ते त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'च्या घाटकोपर शाखेचे वीस वर्षांपासूनचे अध्यक्ष आहेत.
अ.पां. देशपांडे
यामागील विज्ञान आणि इतिहास.