अहमदशाह दुराणी (पश्तो:, फारसी: حمد شاه درانی ;) ऊर्फ अहमदशाह अब्दाली (पश्तो:, फारसी: احمد شاه ابدالي ;) ,जन्मनावाने अहमदखान अब्दाली, (इ.स. १७२२ - इ.स. १७७२) हा दुर्राणी साम्राज्याचा अफगाण संस्थापक होता. आधुनिक काळातील अफगाणिस्तान देशाच्या गाभ्याची बांधणी त्याने स्थापलेल्या साम्राज्यातून झाल्यामुळे तो अफगाणिस्तानाचा जनक मानला जातो.
अहमदखान आपल्या तरुणपणी अफशरी साम्राज्याच्या सैन्यात सैनिक म्हणून दाखल झाला व दाखविलेल्या शौर्यामुळे लवकरच चार हजार अब्दाली पठाणांचा प्रमुख झाला. इराणाचा अफशरी सम्राट नादीरशाह अफशर याचा जून इ.स. १७४७ साली मृत्यू झाल्यानंतर अहमदशाह अब्दाली खोरासानाचा अमीर झाला. आपल्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पठाण टोळ्यांना एकवटून त्याने पूर्वेकडे भारतीय उपखंडातल्या मोगल साम्राज्यास व पश्चिमेकडे खिळखिळ्या झालेल्या इराणातल्या अफशरी साम्राज्याला मागे रेटत आपले राज्य विस्तारले. त्याने दोन-तीन वर्षांच्या आतच वर्तमान काळातील अफगाणिस्तान, पाकिस्तान, ईशान्य इराण व भारतीय उपखंडातील पंजाब प्रदेशात आपली सत्ता विस्तारली.
अहमद शाह दुराणी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?