असगरअली इंजिनिअर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

असगरअली इंजिनिअर

असगरअली इंजिनिअर (जन्म : सालुंबर-राजस्थान, १० मार्च १९३९; - सांताक्रुझ-मुंबई, १४ मे, २०१३) हे एक सुधारणावादी भारतीय लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि इस्लामचे उदारमतवादी भाष्यकार म्हणून प्रसिद्ध होते. उदारमतवादी इस्लामच्या मांडणीसाठी ते जगभर ख्यातकीर्त होते. बोहरा धर्मगुरूविरोधात बंड करून त्यांनी बोहरी पंथीयात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठी चळवळ राबवली. त्यांनी प्रोग्रेसिव्ह दाऊदी बोहरा चळवळीचे नेतृत्व केले. महाराष्ट्रात डॉ. मोईन शाकीर आणि प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्यासोबत त्यांनी काम केले. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या मुस्लिम ओबीसी चळवळीत ते बराच काळ सक्रिय होते. मराठी मुसलमानांच्या जातिपाती त्यांनी देशभरात नेल्या. मुस्लिम ओबीसी चळवळीतून जातआधारित मराठी मुसलमानांची रचना करून समाजासाठी शासकीय सवलतीची मागणी करण्यात आली. असगरअली इंजिनिअरमुळे मराठी मुसलमानांचे प्रश्न देशपटलावर आले. त्यातूनच उत्तरेत पसमांदा आंदोलन उभे राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →