मार्कंडेय पुराणात आठ सिद्धींचे वर्णन आहे. कठोर उपासनेमुळे व विशिष्ट प्रकारच्या आचरणाने त्या प्राप्त होतात असा समज आहे. हनुमानाने गरिमा सिद्धी वापरून आपले शरीर मोठे केले व लंकेकडे उड्डाण केले असा समज आहे.
अणिमा महिमा चैव लघिमा गरिमा तथा।
प्राप्तिः प्राकाम्यमीशित्वं वशित्वं चाष्ट सिद्धयः॥
अणिमा,महिमा,लघिमा,गरिमा,प्राप्ति,प्राकाम्य,ईशित्व वशित्वं या आठ सिद्धी आहेत. या आठ सिद्धीवर चर्चा करण्याआधी आपण सिद्धी म्हणजे काय ते पाहू‐
सिद्धी या शब्दाचा अर्थ आहे- पूर्णता, प्राप्ति,स फलता इ. 'सिद्धी' हा शब्द मार्कंडेय पुराणात, महाभारतात मिळतो. पंचतंत्रामध्ये असामान्य कौशल्य, असामान्य क्षमता अर्जित करण्यास सिद्धी असे म्हणले गेले आहे.मनुस्मृतीमध्ये या शब्दाचा प्रयोग 'ऋणमुक्ती' या साठी केला आहे. सांख्यकारिका, तत्वसमास, तांत्रिक बौद्धसम्प्रदाय यामध्ये या शब्दाचा अर्थ विशिष्ट पद्धतीने दाखविला आहे- 'चमत्कारिक साधनाद्वारा अलौकिक शक्तींचे अर्जन म्हणजे सिद्धी.'उदाहरणादाखल पहावयाचे झाल्यास दिव्यदृष्टी,एकाच वेळेस दोन जागी असणे,आपल्या आकारास सूक्ष्म अथवा मोठे करणे इ. हिंदू धर्मात आठ सिद्धीवर विश्लेषण आढळून येते.
पातंजल योगशास्त्रात -
'जन्म औषधि मन्त्र तपः समाधिजाः सिद्धयः ।'
असे म्हणले आहे. अर्थात, जन्माने, औषधिद्वारा, मन्त्राद्वारा, तपाने आणि समाधीचे सिद्धींची प्राप्ती केली जाते.
अष्टसिद्धी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.