अश्विनी एकबोटे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अश्विनी एकबोटे (पूर्वाश्रमीच्या अश्विनी काटकर; ?? - २२ ऑक्टोबर, इ.स. २०१६:पुणे, महाराष्ट्र) या एक मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना होत्या.

त्यांनी नंदनवन या नाटकात बालवयात काम केले होते. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी संपादन करीत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी नृत्य हा वि़षय घेऊन एमए केले होते.

अभिनयाबरोबरच त्या शास्त्रीय नृत्य ही शिकल्या होत्या. त्या पुण्यातील कलावर्धिनी नृत्यसंस्थेच्या कोथरूड शाखेच्या प्रमुख होत्या.

अश्विनी एकबोटे यांनी झी २४ तासच्या अनन्य सन्मान या कार्यक्रमात खास ॲंकरिंग केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →