अली अकबर खान

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अली अकबर खान

अली अकबर खान (१४ एप्रिल १९२२ - १८ जून २००९) हे मैहर घराण्यातील एक भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार होते. ते सरोद वाजवण्याच्या कामगिरीसाठी प्रसिद्ध होते . वडील अल्लाउद्दीन खान यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीत आणि वादन यात प्रशिक्षण घेतले व असंख्य शास्त्रीय राग आणि चित्रपट गीतांची रचना केली. १९५६ मध्ये त्यांनी कोलकाता मध्ये एक संगीत विद्यालय आणि युनायटेड स्टेट्स मध्ये १९६७ मध्ये संगीत अली अकबर कॉलेज स्थापन केले ज्याची शाखा स्वित्झर्लंड मध्ये पण आहे.

खान यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले जसे; पद्मभूषण १९६७ मध्ये आणि पद्मविभूषण १९८९ मध्ये, १९९१ मध्ये त्यांना मॅकआर्थर फेलोशिप प्राप्त झाली. खान यांना पाच ग्रॅमी नामांकने पण मिळाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →