अलाहुएला' हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या उत्तर भागात आहे. याच्या उत्तरेस निकाराग्वा, पूर्वेस हेरेदिया प्रांत, आग्नेयेस सान होजे प्रांत, ईशान्येस पुंतारेनास तर पश्चिमेस ग्वानाकास्ते प्रांत आहेत.
अलाहुएला प्रांताचा विस्तार ९,७५७ किमी२ असून २०१०मध्ये येथील लोकसंख्या ८,८८,५७१ होती. हा प्रांत डोंगराळ आहे. कोर्दिलेरा सेंत्राल दि कोस्ता रिका ही पर्वतरांग या प्रांतात उत्तर-दक्षिण आहे. येथे पोआस ज्वालामुखी आणि व्होल्कान अरेनाल यांसह अनेक जागृत ज्वालामुखी आहेत.
अलाहुएला प्रांत
या विषयावर तज्ञ बना.