अलायंझ अरेना

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अलायंझ अरेना

अलायंझ अरेना (जर्मन: Allianz Arena) हे जर्मनी देशाच्या म्युनिक शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००६ फिफा विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमचा वापर सध्या बायर्न म्युनिक व टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन हे दोन फुटबॉल क्लब आपले यजमान सामने खेळण्याकरिता करतात. ६९,९०० आसनक्षमता असलेले अलायंझ अरेना हे डॉर्टमुंडमधील सिग्नल इडूना पार्क व बर्लिनमधील ऑलिंपियास्टेडियोन खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →