अर्जुन ठमाजी डांगळे ( इ.स. १९४५, मुंबई) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि मराठी साहित्यिक आहेत. ते दलित पँथरचे सहसंस्थापक होते. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्टेट युनिटचे अध्यक्षही राहिले आहेत. ते आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. त्यांच्या अनेक कविता, निबंध आणि लघुकथा, समीक्षका प्रकाशित झालेल्या आहेत, तसेच अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित केल्या गेल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अर्जुन डांगळे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?