बौद्धाचार्य शांतिस्वरूप बौद्ध (२ ऑक्टोबर १९४९ - ६ जून २०२०) एक भारतीय लेखक, बौद्ध विद्वान, चित्रकार, प्रकाशक आणि पाली भाषा तज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १९४८ मध्ये एका जाटव दलित कुटुंबात दिल्ली येथे झाला. इ.स. १९७५ मध्ये त्यांनी आंबेडकरी, बहुजन, नवयान बौद्ध, पाली साहित्य आणि दलित साहित्य यांना समर्पित सम्यक प्रकाशन ही प्रकाशन संस्था स्थापन केली. सम्यक प्रकाशनाने २०००हून अधिक पुस्तके प्रकाशित केली असून त्यातील अनेक इंग्रजी, सिंहली, नेपाळी, बर्मी यासह १४ वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहेत. ते धम्म दर्पण आणि दलित दस्तक मासिकांचे संपादक मंडळात होते. ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शांति स्वरूप बौद्ध
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?