अर्चना कामत (१७ जून, २०००) एक भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे. २०१८मध्ये तिने वरिष्ठ महिलांची राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकली होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या भारताच्या टेबल टेनिस संघाचा ती भाग आहे. २०१९मध्ये कटक येथे झालेल्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत तिने ज्ञानशेखरन सत्यन याच्यासोबत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अर्चना गिरीश कामत
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?