अरेना नात्सियोनाला

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अरेना नात्सियोनाला

अरेना नात्सियोनाला (रोमेनियन: Arena Națională) हे रोमेनिया देशाच्या बुखारेस्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ५५,६३४ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम रोमेनियाचे राष्ट्रीय मैदान असून रोमेनिया फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथून खेळतो. हे स्टेडियम युएफाच्या क्रमवारीमध्ये प्रतिष्ठित दर्जाचे आहे.

आजवर येथे २०१२ सालचा युएफा युरोपा लीगचा अंतिम सामना तसेच इतर अनेक महत्त्वाचे सामने खेळवले गेले आहेत. युएफा यूरो २०२० साठी निवडण्यात आलेल्या १३ यजमान शहरांपैकी बुखारेस्ट एक असून अरेना नात्सियोनालामध्ये ह्या स्पर्धेचे एकूण ४ सामने खेळवण्यात येतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →