अरुणोदय हे ठाणे शहरातून प्रसिद्ध होणारे पहिले मराठी दैनिक होते. काशिनाथ विष्णू फडके यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. २२ जुलै १८६६ रोजी अरुणोदयचा पहिला अंक प्रकाशित झाला. मुंबईतील पहिल्या वर्तमानपत्रानंतर ३४ वर्षानंतर ठाण्यात वर्तमान पत्र सुरू झाले. ठाणे हे मुंबईच्या जवळ असून व रेल्वे सुविधा असूनही ठाण्यात वर्तमान पत्र निघण्यास खूप वर्षाचा काळ लोटला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरुणोदय (वृत्तपत्र)
यामागील विज्ञान आणि इतिहास.