अरुंधती केश

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अरुंधती केश

अरुंधती केश (इंग्रजी: Coma Berenices; कोमा बेरनाइसेस) उत्तर खगोलार्धातील एक तारकासमूह आहे. तो सिंह आणि भूतप यांच्या मध्ये आहे आणि दोन्ही गोलार्धातून दिसतो. याच्या पाश्चात्य नावाचा ग्रीक भाषेतील अर्थ "बेरनाइसचे केस" असा असा आहे. हे नाव ईजिप्तची राणी बेरनाइस दुसरी हिच्या नावावरून दिले गेले आहे. तिने धार्मिक कारणासाठी तिचे केस दान केले होते.

अरुंधती केश ५६ अंश दक्षिण अक्षांशाच्या उत्तरेकडील सर्व भागातून दिसते, आणि २ एप्रिलच्या मध्यरात्री भूमंडलावर येते. आकाराने मोठे नसले तरी याच्यामध्ये एक दीर्घिकांचा महासंघ, दीर्घिकांचे दोन संघ, एक तारकागुच्छ आणि आठ मेसिए वस्तू आहेत

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →