अरबी वर्णमाला

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अरबी वर्णमाला

अरबी वर्णमाला (अरबी: أبجدية عربية) ही आशिया व आफ्रिकेतील अनेक भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी एक वर्णमाला आहे. ही वर्णमाला अरबी लिपी वापरून लिहिली जाते. अरबी व उर्दू ह्या अरबी वर्णमाला वापरणाऱ्या दोन प्रमुख भाषा आहेत. अरबी वर्णमाला ही जगातील दुसरी सर्वाधिक वापरली जाणारी वर्णमाला आहे (लॅटिन वर्णमालेखालोखाल).

अरबी अक्षरांचा उपयोग सर्वप्रथम अरबी लिहिण्यासाठी केला गेला. कुराण हा इस्लाम धर्मातील पवित्र ग्रंथ अरबी लिपीमध्येच लिहिला गेला आहे. अरबी व्यतिरिक्त फारसी, उर्दू, पश्तो, बलुच, मलाय, स्वाहिली, काश्मिरी, सिंधी, पंजाबी (पाकिस्तानमध्ये) व इतर अनेक मध्य आशियामधील भाषा अरबी लिपीमध्ये लिहिल्या जातात.

अरबी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते व त्यात २८ मुळाक्षरे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →