अमीरबाई कर्नाटकी (१९०६ – ३ मार्च, १९६५) या एक भारतीय अभिनेत्री/गायिका आणि हिंदी चित्रपटातील पार्श्वगायिका होत्या. त्यांना कन्नड कोकिला असेही म्हणत. महात्मा गांधी त्यांच्या वैष्णव जन तो या गाण्याचे निस्सीम चाहते होते. अमीरबाई कर्नाटकी यांचा जन्म कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बिलगी शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या पाच बहिणींपैकी मोठी बहीण गौहरबाई या प्रसिद्धी होत्या. अमीरबाईंनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्या मुंबईला गेल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमीरबाई कर्नाटकी
थोडक्यात पण महत्त्वाचे.