अभिजीत कोसंबी हा कोल्हापूरचा एक गायक आहे. त्याने २००७ साली झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरची सा रे ग म प संगीत स्पर्धा जिंकून स्पर्धेचा पहिला 'महागायक' होण्याचा सन्मान मिळविला. कोसंबी गझलकार, संगीतकार, गीतकार म्हणून सुद्धा ओळखले जातात. महाराष्ट्रात तसेच भारतभरात त्यांनी विविध कार्यक्रम व स्टेज शो ते करत असतात. सध्या ते कोसंबी म्युझिक अकॅडमी मुंबई येथे "संगीत गुरु" व "संचालक" पदावर कार्यरत आहेत.
कोसंबी यांचा जन्म 24 जानेवारी 1982 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांनी, पंडित अरुण कुलकर्णी, रजनी करकरे देशपांडे तसेच भारती वैशंपायन यांच्या कडून संगीताचे धडे घेतले. कोसंबी यांनी संगीतात कला शाखेतून पदव्युत्तर शिक्षण आणि पी एच डी केली आहे. याशिवाय त्यांनी इंग्रजी विषयात देखील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
अभिजीत कोसंबी
थोडक्यात पण महत्त्वाचे.