अन्नू कपूर (२० फेब्रुवारी १९५६, जन्म नाव अनिल कपूर) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आणि दूरचित्रवाणीचा प्रस्तुतकर्ता आहे. १९९३ ते २००६ या काळातील झी टीव्ही वाहिनीवरिल अंताक्षरी या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता व अनेक चित्रपट जसे की मिस्टर इंडिया (१९८७), विकी डोनर (२०१२) आणि जॉली एलएलबी २ (२०१७) साठी ते प्रसिद्ध आहेत. विकी डोनर चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेर पुरस्कार, तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मधील सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अन्नू कपूर
थोडक्यात पण महत्त्वाचे.