अनुपमा उजगरे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डॉ. अनुपमा निरंजन उजगरे या मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. शिक्षण एम्, ए., बी.एड्., पीएच्.डी. सध्याचे वास्तव्य : ठाणे(पश्चिम), महाराष्ट्र. त्यांचे पती निरंजन हरिश्चंद्र, सासरे हरिश्चंद्र भास्कर आणि आजेसासरे रेव्हरन्ड भास्कर कृष्ण उजगरे, हेही साहित्यिक होते. अनुपमा उजगरे यांनी कथा, कविता, ललित आणि संशोधनपर लेखन केले आहे.

अनुपमा उजगरे यांचे दिवंगत पती निरंजन उजगरे यांनी ‘सोविएत भावकविता’, ‘हिरोशिमाच्या कविता’, आणि ’भारतीय भाषांच्या कवितांचा मराठी अनुवाद’ असे अनुवादित कवितांचे मोठे दालन मराठी वाचकांसाठी यापूर्वीच खुले केले होते. पतीचा हा वारसा अनुपमा उजगरे यांनी समर्थपणे चालवला आहे. त्याचा प्रत्यय ‘सीमेवरून’ या कवितांच्या अनुवादातून येतो.

डॉ. अनुपमा निरंजन उजगरे या, २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. प्रसिद्ध कवयित्री असल्याने त्यांचा ठाणे-मुलुंड परिसरातील अनेक कविसंमेलनांत सहभाग असतो.

अनुपमा उजगरे यांनी अनेक कवीच्या कवितासंग्रहांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →