अनंत नागरकट्टे उर्फ अनंत नाग (जन्म:४ सप्टेंबर, १९४८) हे एक भारतीय अभिनेते आहेत विशेषतः कन्नड चित्रपटसृष्टीत यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात २०० हून अधिक कन्नड चित्रपट असून, सोबत हिंदी, तेलुगू, मराठी, मल्याळम आणि इंग्रजी चित्रपटांचा देखील समावेश आहे. चित्रपटा व्यतिरिक्त त्यांनी रंगमंचावरील नाटके, समांतर सिनेमा आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्ये देखील काम केले आहे.
प्रा. प.वि. नंजराज दिग्दर्शित संकल्प (१९७३) या चित्रपटातून नाग यांनी आपल्या चित्रपटाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. संकल्प चित्रपटाने कर्नाटकात सात राज्य पुरस्कार जिंकले. श्याम बेनेगल यांच्या अंकुर (१९७४) या चित्रपटातून त्यांनी समांतर सिनेमात प्रवेश केला. ना निन्ना बिदलारे (१९७९), चंदनदा गोम्बे (१९७९), बेंकिया बढे (१९८३), हेंडथिगे हेलबेडी (१९८९), गणेशना मदुवे (१९९०), गोवरी गणेशा (१९९१), मुंगारू माले (२००६) व गोधी बन्ना साधराना मिकट्टू (२०१६) हे त्यांचे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी कन्नड चित्रपट आहेत.
इस १९८६ मध्ये आरके नारायण यांच्या कथांवर आधारित दूरदर्शनवरील प्रसारित मालिका मालगुडी डेजमध्ये त्यांनी अभिनय केला. नाग यांनी सहा दक्षिणेचे फिल्मफेअर पुरस्कार आणि पाच कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार मिळवले आहेत. ते प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते शंकर नाग यांचे मोठे भाऊ आहेत.
अनंत नाग
यामागील विज्ञान आणि इतिहास.