केसरीचे संपादक ज.स. करंदीकर यांचे चिरंजीव अनंत जनार्दन करंदीकर (जन्म : ३० डिसेंबर १९०१) हे एक मराठी पत्रकार आणि राजकारण, इतिहास व खगोलशास्त्रावर लिखाण करणारे पंडित लेखक होते. १९३० च्या दशकात करंदीकर हे पुणे शहरातील क्रांतिकारकांच्या कळपात होते. त्यावेळी त्यांनी ’केसरी’ वर्तमानपत्रात हिंदुस्थानातल्या क्रांतिकारकांच्या चळवळीवर एकापाठोपाठ एक असे नऊ लेख लिहिले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणावरही काही लेख लिहिले हे सर्व लेख इ.स. १९३९ साली पुस्तकरूपात प्रकाशित झाले.
तेव्हा करंदीकरांना गणेशपंत सावरकरांकडून समजले की महात्मा गांधी आणि अफगाणिस्तानचे अमीर अब्दुल्ला यांचे घनिष्ट संबंध आहेत. सावरकरांनी करंदीकरांना गांधींच्या मुसलमान मित्रांसंबंधी माहिती गोळा करायला सांगितली. त्या माहितीवर आधारलेले Gandhi-Muslim Conspiracy नावाचे एक स्फोटक पुस्तक करंदीकरांनी १९४१साली लिहिले. त्या पुस्तकात केलेल्या आरोपांना गांधींनी कधीही उत्तर दिले नाही, मात्र हैदराबादच्या नबाबाने त्या पुस्तकावर बंदी आणली.
इ,स, १९४५ च्या सुमारास करंदीकर हे नथूराम गोडसे आणि नारायण दत्तात्रय आपटे यांनी चालविलेल्या ’अग्रणी’ या मराठी दैनिकात लिहू लागले. तिथे, भारतीय क्रांतिकारकांनी हिंसेपासून दूर रहावे असा सल्ला देणारा अग्रलेख लिहिल्यानंतर त्यांना सप्टेंबर १९४७मध्ये ते वर्तमानपत्र सोडावे लागले. त्यानंतर अ.ज. करंदीकर मुक्त पत्रकारिता करू लागले. (अग्रणी दैनिकाचे आधीचे नाव ’हिंदू राष्ट्र’ असे होते.)
अनंत जनार्दन करंदीकर
थोडक्यात पण महत्त्वाचे.