अनंत अंबाणी (जन्म:१० एप्रिल, १९९५) एक भारतीय उद्योगपती, परोपकारी आणि पशुप्रेमी आहेत. अंबाणी हे जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड, रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड, आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी लिमिटेड यासह अनेक प्रमुख कंपन्यांच्या संचालकपदी कार्यरत आहेत. अंबाणी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष मुकेश अंबाणी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबाणी यांचा धाकटा मुलगा आहेत.
अंबाणी पशू प्रेमी असून प्राणी कल्याण आणि परोपकारी कार्यात सक्रियपणे सहभागी असतात. विशेष म्हणजे, त्यांनी गुजरातमधील जामनगर येथे वनतारा हे ३,००० एकरचे प्राणी बचाव केंद्र स्थापन केले आहे.
अनंत अंबाणी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.